भाग 1 "वृंदा... बसं झालं सोड हा वेडेपणा! " तुला कळतय ना मी काय बोलतेय. वृंदा... रुही रागाने तिच्यावर जोरात ओरडली. इतकं होऊन ही तिचं लक्ष नव्हत . रुहीने रागात वृंदा च्या हातून मोबाईल हिसकावून घेतला. "रूही .. काय झालं? काही बोललीस का? वृंदा ने अतिशय शांतपणे तिला विचारल. तिच्या या शांततेवर रूही निशब्द झाली. इतकं सारं घडून सुध्दा ही अजुन तिथेच आहे." का रे देवा का इतका त्रास ह्या निष्पाप जीवाला !" भूतकाळातील घटनां आठवून रुहीचे डोळे भरून आले. स्वतःला सावरत "काही नाही ग उशीर होतोय निघूया ना?" ती बसं इत