# आयुष्यआयुष्य आपल्या हातात नसतं; ते आपल्या कर्मात असतं. जितकं मोठं बक्षीस हवं असेल, तितकंच शुद्ध आचरण महत्त्वाचं असतं. माणसाचं आयुष्य हे एखाद्या चमत्कारासारखंच असतं. फक्त स्वतःप्रती आणि सर्व सजीवांप्रती शुद्ध भाव असणं महत्त्वाचं आहे.आयुष्यात जे काही येतं ते ठरलेलं असतं; पण ते कसं स्वीकारायचं, त्यातून काय शिकायचं आणि कितपत अनुभव घ्यायचा, हे आपल्या हातात असतं. तेच तर अनुभव असतात.आयुष्य हा एक असा प्रवास आहे की जसा जन्मताना आपण कोऱ्या कागदासारखे येतो, तसंच जातानाही व्हायचं असतं. अनुभवांची शिदोरी सोबत असते, पण मनावर कोणत्याही गोष्टीचं ओझं नसावं.आयुष्य हलुवार, संथ, शिथिल, सहज आणि लवचिक असावं. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक परिस्थितीत लवचिक राहता आलं