प्रकरण ३दुपारी सव्वाचार वाजता वज्र थकून भागून एका टेकडीच्या उतारावर झाडाखाली पहुडला होता.बघता बघता त्याने बऱ्यापैकी अंतर कापलं होतं. अंगाला मिरपूड लावण्याची कल्पना त्याला पॅपिलॉन कादंबरी वरून सुचली होती आणि ती फळाला आली होती. कुत्रे मागावर आले नव्हते.बंदिष्टी ला मारल्यानंतर सगळे पहारेकरी परत गेले होते. कदाचित एकच कैदी पाळला असं वाटल्यामुळे असेल किंवा वज्र न सापडल्यामुळे त्यांनी नाद सोडला असेल.पुन्हा गिनती केल्यावर त्यांच्या लक्षात येईल की दोन जण पळाले, एक मेला पण एक निसटला.एव्हाना सगळीकडे बातमी पोचवून जवळच्या पोलीस स्टेशन्स ना सावध केलं गेलं असेल. अत्ता वज्र जिथे विसावला होता तिथून रेल्वे स्टेशन पाच किमी होतं.पण अंधार पडे पर्यंत तो