आज त्याचा वाढदिवस होता अप्पाना माहित होते की, आज तो येणार भेटवस्तू वाटणार खोटी काळजी असल्यासारखे दिखावे करणार आशीर्वाद घेणार आणि निघून जाणार त्याचा वाढदिवस टाळण्याचे हे अप्पाचे दुसरे वर्ष होते सकाळ पासून इथून कुठे तरी निघून जावे असेच त्याना वाटत होते त्याची होणारी चिडचिड देशपांडे आजोबा गुपचूप टिपत होते "काय अप्पा काय झालं ..."?. "काही नाही देशपांडे " "अहो मघास पासून मी तुमची तळमळ पाहतोय सांगा काय झालं ते "? "मला आज बाहेर जावंस वाटतेय " "बाहेर कुठे "? "माहित नाही पण कुठेतरी " "कुठेतरी म्हणजे?" "कुठेही" "अहो तुम्हला कुठे जायचं हेच माहित नाही तर इथून जायला कसे देतील तुम्हाला