पत्रसुमने..तुझ्या सवयी भाग १

  • 120

प्रिय सोनातुझ्या सवयी बद्दल बोलायचे तर तुला सगळ्या चांगल्या आणि आदर्श सवयी होत्याकुठ खोड काढावी असे कधी तुझ्याकडून घडलेच नाहीखरोखर "आदर्श माणूस" होतास तूमुख्य म्हणजे तुला कसलेही व्यसन नव्हते ना पान, ना तंबाखू ,ना सिगरेट , ना दारूकसलेही व्यसन न करणे ही तुझी एक अतिशय चांगली सवय होतीतुला व्यसन एकच होत ते म्हणजे माझ्यावर प्रेम करणे सतत माझी काळजी घेणे आणि मला आनंदात ठेवणेसकाळी उठल्या उठल्या तुझी पहिली सवय म्हणजे फ्रीज उघडून आधी दुधाची पिशवी बाहेर काढायचीकिचन टॉवेलवर पिशवी थोडी थोडी आपटून त्यातली पिशवीच्या कडेला लागलेली साय सुटी करून घ्यायचीमग तोंड धुवून ब्रश करायचेब्रश झाला की जीभ घासायचीजीभ कायम स्वच्छ