जया देव तारी–अंतीम भाग १० येशाला वाड्याबाहेर काढला त्यावेळी देवस्थानचे मानकरी दात्ये यांचा मोठा मुलगा सदानंद देवगडात मामलेदार म्हणून आला. त्याच्या कानावर ही वार्ता गेल्यावर त्यानी गावच्या तलाठ्याला खोतांच्या मिळकतींची शोधचौकशी करायली सांगितली. घरभाटासह सगळ्या मोठ्या मिळकती शंभू देसायाच्या नावावर लागलेल्या होत्या, मात्र मळ्यातली सव्वा एकर जमीन कोकाटे आणि देवळेकर यांच्या कूळ वहिवाटीखाली असली तरी अद्याप खोतांच्या नावावर होती. गावच्या मराठी शाळेची इमारत असलेली चौतीस गुंठे राजरस्त्यालगत मोक्याच्या जागची जमिन आणि देवराई पासून ते सड्यापर्यंत सलग बारा एकर वरकस जमिन यादोन्ही मिळकती वारस तपासात आलेल्या नसल्यामुळी शिल्लक राहिलेल्या होत्या. नंदाभाऊनी कूळाना बोलावून निम्मे वाटणी येशाला सोडायची तडजोड