तिजोरी - प्रकरण 5

  • 345
  • 123

प्रकरण ५एका दिवशी सकाळी वज्र उठला आणि आपलं आवरल्यावर  रेस्टॉरंट मधे गेला.चहा, नाश्ता ची काय सोय होतं आहे हे पाहण्यासाठी. सांझी तिथे किचन ओटा साफ करत होती.“ गुड मॉर्निंग ” वज्र म्हणाला. तिने त्याच्याकडे बघितलं आणि पुन्हा आपल्या कामाला लागली.“ मी मदत करू का तुम्हाला?” त्याने पुन्हा विचारलं.“ मला लागलं तसं काही तर सांगेन मी.” तुटकपणे ती म्हणाली.“ मला चहा हवा होता.” वज्र म्हणाला.“ बाहेर बस.” पुन्हा ती फटकन पणे बोलली.ती खरंच सुंदर होती. अत्ता काम करतांना तर जास्तच छान दिसत होती.वज्र तिच्याकडे बघतच राहिला.“ काय बघतो आहेस माझ्याकडे टक लावून ?”“ नाही... काही नाही.. म्हणजे..” गोंधळून तो म्हणाला.तिने हाताने