प्रिय सोना बाजारातून किराणा आणताना सुद्धा ठरलेल्या पेक्षा थोडा जास्त आणायचा म्हणजे कधी काही कारणाने बाजार करायला उशीर झाला तर अडचण येऊ नये..To be at safer side....असे तुझे calculation असेकोरोना काळात तू एवढे घरगुती वापराचे सामान घेऊन ठेवले होतेस की ते आपल्या दोघांसाठी चार एक वर्ष पुरले जेवण अथवा खाणे काहीही झाले तरी त्यानंतर दहा मिनिटे शतपावली करायची तुझी सवय होतीआपण कुठेही ट्रिपला गेलो तरी ही शतपावली आणि सकाळचे फिरणे असायचेच...त्यात खंड पडत नसेसकाळचे चाळीस पंचेचाळीस मिनिटे फिरणे आणि वीस मिनिटे शरीराला स्ट्रेचिंग देणारे काही exercise हे तू रोज न चुकता करीत असे आणि तुझ्या सोबत मीही करीत असेमी फिरायला