प्रिय सोना तू नेहमी up-to-date रहात होतास इस्त्रीचे कपडे इन केलेला पॅन्ट शर्ट त्यावर पट्टा प्रवासाला जाताना वेगवेगळे टी शर्ट त्याला मॅच पँट चार खिशांची प्रवासी भारतीय पॅन्टnखुप महागाचे लेदर चे पट्टे तू विकत घेत असे पायात कायम बूट मोजे ब्रँडेड वेगवेगळ्या कंपन्यांचे बूट थंडीत गरम राहणारे आणि उन्हाळ्यात सुती मोजे दर सहा महिन्यांनी बूट बदलणे कधीही मोजे घालताना सुद्धा पाय पुसून मोज्याने झटकून मोजे घालणं ही तुझी सवय होती आधी तू टी शर्ट अजिबात वापरत नव्हता मात्र नंतर तुझा डॉक्टरी पेशा थोडा कमी केल्यावर प्रवासाला, फिरायला तू टी शर्ट वापरू लागला तरीही तुझे टी शर्ट कायम उच्च प्रतीचे आणि सुंदर