विलक्षण - 4

विलक्षण भाग ४सकाळी मी सर्व कामे आटोपून पुन्हा कामाला लागलो.मला आजच ती वही पूर्णपणे वाचायची होती.माझ्यासाठी आता ती लिपी अगम्य राहिली नव्हती.मी झपाझप भाषांतर करत गेलो.सुमारे दिड तासात मी सगळी वही भाषांतरीत केली.सगळा इतिहास माझ्या समोर होता.मी लताबाईंनी लिहिलेली माहिती वाचायला सुरुवात केली.....'त्या रात्री मी बेभानपणे आडवाटेने चालत पहाटेला एका गाडीतळावर पोहचले.माझ्या पायात काटे घुसले होते.हात पायावर ओरखडे उमटले होते. वाटेत एक नदीवर मी हातपाय धुतले. चादरीत गुंडाळली मुलगी आता जागी झाली होती.तिची अफूची नशा उतरली होती.ती सारखी रडत होती. मला कळत नव्हतं मी नेमकं काय कराव.तिथल्या चहावाल्या आजोबांकडून दुध घेऊन मी ते मुलीला पाजलं.सर्व्हिस गाडीतून कोल्हापूर गाठलं.तिथे माझी मावशी