विलक्षण ५ त्या रात्री मी थोडा निवांत होतो.माझ्या समोर कोणतंहीकाम नव्हतं.खूप प्रवास केल्याने मी थकलो होती.पडल्या पडल्याच मला झोप लागली .त्या रात्री मला जाग आली नाही.सकाळी सहा वाजता जाग आली ती समोरच्या शेवग्याच्या झाडावर किलबिल करणा-या पक्षांमुळे.मी उठून खिडकीची काच सरकवली. शेवग्याला छान पिवळा फुलोरा आला होता.त्यावर चिमण्या आणि बुलबुल पक्षी भिरभिरत होते. सकाळच्या या प्रहरी त्यांचा आवाज मन उत्साहित करत होता.गाणी गुणगुणत मी माझी कामे पूर्ण केली.सगळ आटोपल्यावर मी पुन्हा पुन्हा काम सुरू केले.दुपार पर्यंत रघुनाथ पुजारी येणार होते.त्या पूर्वी सगळी जुळवाजुळव करावी लागणार होती.मी टेबलावर, मूळ कागद...त्यांचं भाषांतर... बाळंत विड्याची पेटी.... आणि ते वाळे ठेवले. बाहेर स्वच्छ ऊन