जन्म आईने दिला, पण जपलं साऱ्यांनी...बाबांच्या, दादाच्या, काकांच्या, सर्वांच्याच, आजूबाजूच्यांच्यासुद्धा लाडकीच... मी अशी कोणाची एकटी किंवा फक्त बाबांची नव्हतेच...जन्म आईने दिला, पण सांभाळलं माझ्या स्वभावाने... म्हणजे सर्व आजूबाजूच्यांनीच...प्रत्येकाला हेवा वाटायचाच की ती आमचीच असायला पाहिजे...त्यातच एक वहिनी मला खूप आवडलेली... अगदी मी लहानच होते. पण त्या वहिनी आणि त्यांची ती साडी... मला त्यांच्यात माझी आईच दिसायची. अजूनही डोळ्यांसमोर त्या आणि त्यांची गुलाबी रंगाची साडी नेसलेली प्रतिमा तशीच उभी र