श्री गजानन विजय

श्री गणेशाय नमः: श्री गजानन महाराज की जय श्री गजानन विजय श्री दासगणू महाराज म्हणतात, हे गणपती गौरी पुत्र मयुरेश्वरा, कार्यारंभ करताना सर्व लोक, विद्वान, साधुसंत, सत्पुरुष तुझे स्मरण करतात. तुझ्या कृपेची अगाध शक्ती अवघी विघ्ने भस्म होतात. मी तुझ्या चरणी वंदन करतो या दासगणुंच्या मुखाने रचना तू बनवून घे मी अज्ञान व मंदमती आहे तू माझ्या चित्तात वास केलास तर माझ्याकडून हे काव्यनिर्मितीचे कार्य पूर्ण होईल. ब्रह्माची प्रवृत्ती , कवीवरांची ध्येयमुर्ती अशी ब्रह्मकुमारी शारदा, आदिमाया सरस्वती व जगदंबेला साष्टांग नमस्कार करुन प्रार्थना करतात तुझ्या कृपेने पांगळा पर्वत चढू शकतो. मुका सभेमध्ये व्याख्यान देऊ शकतो अशी तुझी कीर्ती आहे. त्या कीर्ती