तिजोरी - प्रकरण 6

प्रकरण ६रात्रीचे पावणे दोन वाजले होतं वज्र अजूनही तिची वाट बघत पेट्रोल पंपा जवळ एक खुर्ची टाकून बसला होता हातात सिगरेट पेटवून त्याचे झुरके घेण्यात मग्न होता. कोणतीच वाहनं आता येत नव्हती.अचानक त्याला ती बाहेर आलेली दिसली. आपण नेमकं कुठे बसलो हे तिला कळावं म्हणून हातातल्या सिगरेटची ठिणगी तिला दिसेल अशा पद्धतीने त्याने हात हलवला. ती त्याच्या शेजारी येऊन खुर्चीत बसली."तू गोंधळात टाकलंस मला. तू बोगस माणूस आहेस हे माझ्या लक्षात आलं होतं पण तू तिजोरी फोडणारा दरोडेखोर असशील आणि तुरुंगातून पळून आलेला कैदी असशील हे मला नवीनच होतं. तू एकदम सेलिब्रेटीच झाला आहेस.""जोपर्यंत मी इथे माझी नोकरी करतोय आणि