तिजोरी - प्रकरण 7

  • 180
  • 96

प्रकरण ७पलाश घोषने सुद्धा तिच्याकडे चमकून पाहिलं.त्याचा विश्वासच बसला नाही.“ याला एक छदाम सुद्धा घेऊन देणार नाही.सगळी रक्कम माझी आहे ही.तू मला थांबवू शकशील असं मनातही आणू नको.”“ मूर्ख बये, आपल्या दोघांसाठी हे पैसे मी साठवले आहेत.सगळ्या जगाची सफर तुला घडवायची असं माझ्या मनात होतं. ते रिव्हॉल्व्हर भरलेलं आहे.खाली टाक ते आणि विचार कर शांतपणाने.” –पलाश“ खाली टाकण्यासाठी मी ते हातात घेतलेलं नाहीये. मी पोलिसांना सांगते की एका दरोडेखोराला तू आश्रय दिला आहेस आणि तिजोरीतलेते पैसे दोन नंबरचे आहेत. त्या पैशावर तू टॅक्स  भरलेला नाहीस. गुमान माझ्या मार्गातून दूर हो नाहीतर गोळी घालीन मी तुला.” सांझीने दम भरला.वज्र अजूनही तिजोरीच्या