कुंकू सौभाग्याचे - 1

  • 552
  • 231

.....असं म्हणतात मुली हया परक्या असतात, आणि हे बऱ्याच अंशी खरे आहे.तीचे स्वतःचे घर कूठे असते...?? लग्न होईपर्यंतच तीच्या आई बाबाचे घर तिचे स्वतःचे घर असते  लग्नानंतर ती तिच्या आईच्या घरी फक्त एक पाहुणी असते आणि सासरच्या घरी ती दुसऱ्याची मुलगी म्हणून असते... आणि हीच तिची ओळख अखेर पर्यंत असते. म्हणजे ती कुठेही असो परकी च असते. मुलीला घरची लक्ष्मी म्हणतात पण ही लक्ष्मी तिचे संपूर्ण आयुष्य तिच्या अस्तित्वाच्या शोधात घालवते.  आणि अशा परिस्थितीत ती विधवा झाली तर त्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होउन जाते