विलक्षण - 6

विलक्षण भाग ६(कोणातरी नोकराला जाग आली.वर उठणार्या ज्वाळा आणि धूर बघून त्याची बोबडी वळली.नेमक्या कुठच्या खोलीत आग लागली हेच कळेना.त्याने तोंडावर हात ठेवून बोंब ठोकली.तसा सगळा वाडा जागा झाला.नोकर -चाकर, घरातली माणसं ओरडत धावली.आरडाओरड ऐकून शेजारच्या माणसांनी मदतीसाठी धाव घेतली.)     अगदी त्याच वेळी पूर्णपणे जळलेल्या गौरीचा आत्मा देह सोडून बाहेर पडला.अतीशय तरल अश्या वायुरुप अवस्थेत ती हवेत तरंगत होती.समोरची धावपळ तिला दिसत होती.पण देहमुक्त झालेल्या गौरीची तडफड चालली होती ती स्वतःची मुलगी कुठे आहे ते पाहण्याची.पण त्या खोलीत फक्त राख आणि तिच्या स्वतःच्या देहाची तुटलेली हाडे...जळून खाली पडलेल्या छप्पराचे भाग दिसत होते.ती हताश झाली.साळसूदपणाचा आव आणून धावपळ करणारे विश्वंभर व