.......सीमा त्याच कपाटाजवळ बसून तिचे जुने संभाषण आठवून रडत होती.खूप उशीर झाला होता आणि सीमा तयार होऊन अजून बाहेर आली नव्हती, म्हणून तिची आई स्वतः तिला भेटायला गेली."सीमा... सीमा...!! तू तयार आहेस की नाहीस....?? अजून किती वेळ लागेल, रात्र होईल मग...??"सीमाला हाक मारून सीमाची आई सीमाच्या खोलीत पोहोचली, पण सीमा अजूनही त्याच कपड्यात बसून रडत असल्याचे दिसले."जेव्हा तू बाहेर आली नाहीस, तर मला वाटलंच तू इथे बसून रडत असेल...!!सीमाची आई सीमाकडे गेली आणि तिला तिथून उचलायला लागली."उठ इथून आणि वॉशरूमला जा, फ्रेश होऊन ये...!"सीमाच्या आईने काहीशा कडक आवाजात तिला खडसावले."आई, तू जा पिहुसोबत, मला खरच बर नाही वाटत...!""तुला असं कसं