तिजोरी - प्रकरण 8

  • 408
  • 159

प्रकरण ८ड्रायव्हरने शिट्टी का मारली म्हणून वज्रने तिच्याकडे पाहिलं.तिने एक टंच दिसेल असा  टी शर्ट आणि हाफ पँट घातली होती.“ काय चाललंय हे?” वज्रने तिला विचारलं.“ तू नोकर आहेस इथे.तू कोण मला विचारणार?” सांझी म्हणाली.“ आता आपल्या दोघांत काय नातं आहे हे महत्वाचं नाही.आपण दोघेही एकाच संकटात सापडलोय.तुझ्याकडे बघून त्याने शिट्टी वाजवली तू ऐकलीस ना? पुढची व्यवस्था लागे पर्यंत आपण दोघंच इथे राहणार आहोत.आपल्या संबंधाबद्दल कोणीही शंका घेणे किंवा वावड्या उठवणे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतं.” वज्र म्हणाला.“ किती दिवस?”-सांझी.“ मला अत्ताच सांगता येणार नाही. मला लपण्यासाठी मी जागा शोधतोय. ती मिळाली की मी निघून जाईन आणि तुला तिजोरीतले सर्व पैसे