प्रकरण १०वज्र आणि अथांग दोघं एकमेकांकडे पाहत उभे राहिले.अथांग पहिला सावरला. त्याच्या चेहऱ्यावर उडलेला रंग पुन्हा चढला, त्याच्या चेहऱ्यावर ती जुनी, उपहासात्मक हास्यरेषा उमटली, जी वज्रला चांगलीच परिचित होती. तो धावत वज्रच्या दिशेने येऊ लागला."वज्र! खरंच तू आहेस का? तुला पाहून किती आनंद झालाय!"याच क्षणी वज्रला पूर्णपणे जाणवलं की तो त्याला किती मिस करत होता.कित्येक महिने त्याच्या सोबतीशिवाय किती एकटा पडला होता.."अरे माझ्या वाघा!" वज्र म्हणाला. आणि त्याला मिठी मारली. त्याने वज्रची सर्व चौकशी केली वज्रने सुद्धा त्याला पोलिसांच्या तावडीतून कसं निसटलो ते सांगितलं. पण काही गोष्टी हाताच्या राखून.त्याने ते पेपरात वाचल होतं.वज्रने त्याला विचारलं की तो इथे कसा काय