तिजोरी - प्रकरण 11

  • 267
  • 123

प्रकरण ११नाश्ता करत असतानाच वज्रने अथांगला उदित उपाधीबद्दल सांगितले. तू त्याच्यापासून सावध राहा, वज्र म्हणाला.. तो नेहमी अचानक येतो. तो काल आला होता, आणि त्याने मला इतका चिडवलं की मी त्याला मारलं. ते करणं खूप मूर्खपणाचं होतं, पण मी ते केलं. तो पोलिसांकडे जाण्याबद्दल बोलत होता. अथांगने चमकून वर पाहिलं. पोलीस? का? त्याने मला आणि सांझीला एकत्र शारीरिक लगट करताना पाहिलं. घोष एखाद्या बाईसोबत निघून गेला आहे हे त्याला माहीत नाही. त्याला मला शोधून त्रास द्यायचा आहे. अथांगने आपला कॉफीचा कप रिकामा केला आणि सिगारेट पेटवली. सांझी अजून उठली नव्हती. सांझी त्याला का सांगत नाही की घोष परत येणार नाही? एक तर, हा त्याचा विषय नाही, वज्र