ग्रंथ प्रकटन (Disclaimer)हे पुस्तक 'कवी कलश' यांच्या जीवनप्रवासावर, उपलब्ध समकालीन ऐतिहासिक दस्तऐवज आणि आधुनिक संशोधकांच्या निष्कर्षांवर आधारित लिहिलेले ऐतिहासिक चरित्र आहे. या ग्रंथाचा उद्देश इतिहासाच्या पानात उपेक्षित राहिलेल्या एका महान राष्ट्रभक्ताचे वास्तव रूप जगासमोर आणणे हाच असून, कोणाच्याही धार्मिक, सामाजिक किंवा वैयक्तिक भावना दुखावण्याचा लेखकाचा कोणताही हेतू नाही. इतिहास शंभर टक्के खरा ठेवूनही, पुस्तक वाचताना रंजक व जिवंत वाटावे यासाठी मूळ तथ्यांशी तडजोड न करता, केवळ संवाद रचना आणि प्रसंगांचे वर्णन करण्यासाठी कायदेशीर चौकटीत राहून 'क्रिएटिव्ह लिबर्टी' (कलात्मक स्वातंत्र्य) वापरली आहे. या पुस्तकाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, वाचकांना कवी कलश यांच्या साहित्यिक रूपाची अनुभूती यावी म्हणून प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी त्यांनी