तिजोरी - प्रकरण 13

  • 135
  • 63

प्रकरण १३ सुलतान...? पांढरी टाय घातलेल्या माणसाचा, म्हणजे डॅडचा आवाज वज्रला ऐकू आला.  पाठोपाठ एक फळी कुरकुरल्याचा आवाज आला. तू तिथे आहेस का, सुलतान? वज्रने दरवाजाच्या हँडलवर हात ठेवला आणि हळूच दरवाजा उघडला.त्याने मागच्या बाजूला सरकत असताना, पिस्तूल ताठपणे धरून, स्वयंपाकघराच्या दाराकडेलक्ष्य साधलं होतं, बंदुकीचा चाप ओढला गेला.वज्रच्या केसांवरून जवळून गेलेल्या गोळीच्या जीवघेण्या सळसळण्याने त्याच्या हृदयाची धडधड वाढली आणि चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहू लागल्या.वज्रने तीन पायऱ्यांवरून खाली उडी मारली आणि अंधारात गुडघे टेकून बसला.  सांझी आणि अथांग येई पर्यंत स्वत:ला वाचवण्यासाठी वज्रला पराकाष्ठेची धडपड करावी लागणार होती.पंपांवर चांदण्याचा उजेड  पसरला होता. जेवणाची खोली आणि दुरुस्तीच्या शेडभोवती दाट अंधार होता. बंगलाही अंधारात होता, पण तिथे पोहोचण्यासाठी, वज्रलाचांदण्याच्या त्या उजेडातून जावे लागणार