प्रकरण १४त्या नंतर बरोब्बर आठ दिवसांनी ग्वाल्हेर- बंगलोर एक्स्प्रेस, बंगलोर रेल्वे स्टेशनच्या प्लॅट फॉर्मला लागली आणि त्यातून अथांग अहुजा खाली उतरला. स्टेशन बाहेर पडताच रिक्षावाल्यांचा गराडा त्याच्या भोवती पडला. बाहेर येणाऱ्या सगळ्याच प्रवाशांच्या“ साब रिक्षा चाहिये क्या?” म्हणून सगळे मागे लागत होते. काय करावं याचा विचार करत असतांना एका रिक्षा चालकाने“हॉटेल चाहिये क्या” अशी ‘अॅड-ऑन’ ऑफर दिली आणि अथांग मोहात पडला.“ कौनसा अच्छा है हॉटेल है?” अथांग नं विचारलं.“ इधर तो बहोत सारे हॉटेल है, आपका बजेट बोलो, ये टुरिस्ट सिटी है” त्याच्या हातातील बॅग रिक्षात ठेवत ड्रायव्हर म्हणाला.“ बजेट का प्रोब्लेम नही लेकीन रेल्वे में मेरी पर्स से मेरा