लिंग्या गुरवाला लॉटरी लागली भाग 2 लिंग्या गुरवाकडे माल द्यायची नी घ्यायची मापं वेगवेगळी असत. खरेदी किंवा उसनवारी परतफेड मापून घ्यायला केलेल्या मापाच्या माथावळीला दोन- दोन आंगळं रुंद पितळी पट्ट्या बसवून फऱ्याची उंची वाढवलेली असे. साहजिकच त्यात किमान अच्छेरभर धान्य जादा मावत असे. विठलिंगाला एवढी बरकत आली की म्हातारपणी त्याने टोलेजंग सातखणी चौसोपी वाडा बांधला. लिंग्या गुरवाचे दुकान म्हणजे जवळ जवळ व्यापारी पेढी सारखं खटलं होतं. सिझनल नारळ, सुपारी, रातांब्याची सोलं, रातांब्याच्या बिया, रिंगी, काजू बिया हरतऱ्हेची खरेदी केली जायची. कुटूंबातला एखादा बापया देवस्थान सांभाळी आणि बाकीचे बापये नी बायका माणसंही दुकान सांभाळीत. स्वातंत्र्या नंतर तराजू