नमस्कार मैत्रिणींनो... राधे राधे मी नम्रता एका छोट्याशा खेड्यातील शेतकरी कुटुंबातील मुलगी खरं सांगू का शेतकऱ्याचे जीवन खूप कष्टमय व संघर्षाचे असते हे मला माझ्या अनुभवातून कळाले. पहाटेला कोंबड्याने बांग दिली की चार वाजता उठायचं विठ्ठलाला स्नान घालुन नित्यनेमाची देवपूजा करून आईला घर कामात मदत करने हि रोजची सकाळची दैनंदिनी सुरुवात.. एके दिवशी मी शाळेतून घरी आले दप्तर घरात ठेवलं व शेताच्या रस्त्याने शेतात जायला निघाले.शेतात पोहोचल्यावर इकडे तिकडे बघू लागले मला आई काही दिसेना तेवढ्यात माझं लक्ष लांब वरच्या शेतात गेले आई तिथं वाकून काहीतरी काम करत होती. मी आईकडे गेले व आईला विचारले.. आई