विलक्षण - 8

विलक्षण ८( गौरीची हकिकत.....) विश्वंभर कोटणीस तरुणपणात खूपच बिघडलेला होता.उन्मत्तपणा त्यांच्या अंगात ठासून भरला होता.त्यात  विसाव्या वर्षी त्याचे वडील वारले.सगळा कारभार त्याच्या हाती आला.त्याची लहान बहिण द्वारका हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी वयाच्या सोळाव्या वर्षी कागल इथल्या सरदार घराण्यात झाला होता.विश्वंभरने कारभार हाती येताच.नोकरांवर जुलम - जबरदस्ती सुरू केली.आसपासच्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्याने पैसा आणि बळ वापरून आपल्या ताब्यात घेतल्या.तो कसलेला पैलवान होता.तिन -चार जणांना तो सहज अंगावर घेऊन लोळवायचा. मारामारी करणे, धमक्या देणे, बळजबरी करणे असे त्यांचे धंदे होते.दुर्गाबाईला त्याने तिच्या शेतकरी बापाला धमकी देऊन पळवून आणली होती.एका हतूतूच्या सामन्यासाठी तो आपला संघ घेऊन आंब्रड या गावी गेला होता.तिथे पंधरा वर्षांची दुर्गा शेजारच्या मुलींसोबत