लिंग्या गुरवाला लॉटरी लागली भाग 3 मुळात लाख म्हणजे किती हे त्याला तरी कुठे माहिती होतं. दोन दिवसानी लोके मास्तर मासे घ्यायला आले तेंव्हा राधेला अकस्मात आठवलं नी तिने त्याना विचारलं. त्यानी मग शंभराच्या शंभर नोटांचं एक बंडल अशी दहा बंडलं म्हणजे एक लाख होतात. गावतले लिंगायत नी देसाई या असामीना गावात लाखे सावकार म्हणत. तो संदर्भ दिल्यावर लाख रुपयाचं मोल राधेच्या लक्षात आलं. “ बाय माज्ये... लाटरीच्ये इतके पैशे भेटतत काय...... मी चार रोजामागे टिकीट काडलीहा...... माजो जल्म एकादशी रोज झालो तोच आक्डो मी घितलल्या टिकीटीवर हा. म्हंज्ये बवतेक माका भक्षिस मिळात आसा माका वाटता हा......” तीने लोके मास्तराना आप्ण