सप्तपदी - 1

  • 330
  • 135

आज त्या सेव्हन स्टार अशा आलिशान हॉटेल च्या आवारामध्ये विखुरलेल्या पानांची अवस्था सैरावैरा धावायला जागाही कमी पडेल अशी झाली होती . . . संपूर्ण परिसरात धूळ उडवत ते हेलिकॉप्टर हॉटेलच्या आवारात लँड झालं होतं . . . एका व्यक्तीने येऊन उजव्या बाजूच दार उघडताच चंद्रालाही लाजवेल अशी सुंदर मुलगी बाहेर आली . . . लाल लेहंगा त्यावर  मोती कलर ची ओढणी , कोपरा पर्यंत मेहंदी जी अगदीच गडद रंगलेली होती . . .  तिच्या प्रियकराच तिच्यावर असलेलं प्रेमच जणू तो रंग सगळ्यांना सांगू पाहत होता . . . त्यावर असलेला चुडा , पायात नाजूक पैंजण - जीचा चालताना आवाज अगदी मनाला