विक्रम आणि वेताळ जीवन- अनेक प्रश्नचिन्हे( रहस्य कथा) धिर गंभीर पावलं टाकत राजा विक्रमादित्य त्या विशाल वृक्षाच्या दिशेने चालला होता.त्या काळ्या कुट्ट काळोखात आकाशात सतत वीजा चमकत होत्या.त्या चमचमाटात अनेक चित्र - विचित्र आकृत्या सूर मारत इकडे तिकडे फिरताना दिसत होत्या. आजू बाजूला सरसरणाऱ्या सापांचे आवाज ...अंगाला घासून जाणारी वटवाघळे...झाडावर उलटीलटकत असलेली प्रेते...या अशा वातावरणात राजा विक्रमझाडाजवळ पोहोचला.लटकत असलेले एक प्रेत उचलून त्याने खांद्यावर टाकले.त्याच क्षणी असंख्य किंकाळ्या आणि हसण्याचा गडगडाट ऐकू आला.पण त्याकडे लक्ष न देता तो मौन धारण करून तो वाट चालू लागला.तेवढ्यात खांद्यावरच्या प्रेतातील वेताळ म्हणाला..." राजा, तुझे कौतुक करू की कीव करू ते कळत नाही.गेले कित्येक शतके