लिंग्या गुरवाला लॉटरी लागली - अंतिम भाग 4 राधे घरी गेली. तिला बघितल्यावर शेजारणी विचारायला आल्या. राधेला पुन्हा रडायला आले. तिने रडत रडत सगळी हकिकत सांगितली. संध्याकाळ पर्यंत पुऱ्यागाबतडीत वार्ता पसरली. एक दोन बेरकी माणसानी शंका काढली. खर्कट्या हाताची शितं चाटून मगच कावळा हाकलणारी महा कंजूष लिंगायताची जातकूळी. त्याने राधेला जेवायला घातले. भरपूर पांसुपारी देवून वर आणि रुपये वीस तिच्या हातावर टेकवले ते सुखासुखी नाहीत. यात कायतरी पाणी मुरतंय, अशी शंका आल्यावर त्यानी राधेला भेटून कसे कसे काय काय झाले ते खोदून खोदून विचारून घेतले. “तू टिकीट वापिस कित्या घितलंस नाय? टिकीट आसती तर आमी कोनीतरी पुन्ना