Ruthless Love - 2

त्याच्या डॅड वर खूप प्रेम होतं, काही दिवसांपूर्वीच त्याच्या डॅड चा हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाला,...आणि तो पूर्ण बिथरला, आता त्यांचा खरंच मृत्यू झाला की काही घात पात, ज्यामुळे तो तिला तिच्या वडिलांच्या गुन्ह्यांची शिक्षा देत आहें.****तीन वर्षा नंतर.....आग्रा मेंटल असायलम मधील दृश्य...त्या मेंटल असायलम मध्ये ऍडमिट असणारे पेशंट बरोबर एका मागे एक येत होते,. तिथेच एका टेबल वर छोट्या छोट्या बॉक्स मध्ये रंगीबेरंगी टॅबलेट, गोळ्या औषधं ठेवली होती,..आणि तिथे उपस्थित असलेली नर्स बरोबर प्रत्येकाला त्याच्या त्याच्या गोळ्या देत होती,.. आणि त्यांना त्या तिथेच खाऊन दाखवाव लागत होतं,..कदाचित हे त्यांचं रोजचच काम असेल... ते पेशंट सुद्धा एका लाईन मध्ये बरोबर येऊन