निरपेक्ष प्रेम ( जगा वेगळं) - भाग 2

  • 288
  • 105

भाग २ आपण बघितलं : अर्णव ला त्याच्या कामात यश मिळतं आणि ते यश तो कोणाच्या तरी नावाने जपून ठेवतो .. त्याच्या इंडस्ट्री मधे त्याच खूप नाव होतं ... आता पुढे : आज सकाळपासून घर फक्त फोन च्या आवाजाने दणाणून गेलं होतं . नितीन सकाळपासून फोन वर उत्तर देऊन - देऊन वैतागला होता . अर्णव अजून उठला नव्हता म्हणून त्याला हे करणं भाग होतं शेवटी तो त्याचा मित्र आणि secretary दोन्ही होता . शेवटी वैतागून तो डोक्याला हात लावून सोफ्यावर बसला होता . " काय रे नितीन!! काय झालं असा डोक्याला हात लावून का बसला आहेस" . आई ने देवघरातून बाहेर निघताना नितीन