शिवेंद्र आणि बोलणारा मोर - 1

(149)
  • 2.9k
  • 1k

एकदा शिवेंद्र नावाचा एक लहान मुलगा शाळेतून घरी येत होता.  रस्त्यात त्याला एक सुंदर मोर दिसला. मोर खूप उदास दिसत होता.शिवेंद्र म्हणाला, अरे मोरा, तू का रडतोयस?   मोर बोलला, माझं एक निळं पिस पडलं आहे. ते मला खूप आवडतं. शिवेंद्रने सगळीकडे शोधलं. अखेर झाडाखाली ते पिस सापडलं.  त्याने ते पिस मोराला दिलं.मोर खूप खुश झाला आणि म्हणाला, तू खूप चांगला आहेस शिवेंद्र.  बदल्यात मी तुला एक जादूचे पिस देतो. हे पिस जेव्हा जेव्हा चमकेल, तेव्हा समज तू काहीतरी चांगलं केलं आहेस. दुसऱ्या दिवशी शाळेत टीचरने विचारलं, खिडकीची काच कोणी फोडली?   सगळे गप्प बसले. पण शिवेंद्र उभा राहिला आणि म्हणाला, टीचर, मी चुकून फोडली. सॉरी. त्याच वेळी त्याच्या खिशातलं