दृष्टीकोन बदलला की जीवन उजळते

  • 696
  • 243

"जग बदलण्यापेक्षा स्वतःचा दृष्टीकोन बदलला तर संपूर्ण जग बदलल्यासारखे वाटते." हे वाक्य जीवनाचे सार सांगते. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात परिस्थितीपेक्षा त्या परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टीकोन अधिक महत्त्वाचा असतो. म्हणूनच जीवनात यश, आनंद आणि समाधान मिळवण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन असणे अत्यंत आवश्यक आहेजीवनात प्रत्येक माणूस आपल्या मनात अनेक स्वप्ने, आशा आणि अपेक्षा घेऊन जगत असतो. पण प्रत्येक वेळी परिस्थिती आपल्या मनाप्रमाणे घडत नाही. काही वेळा जवळची माणसे साथ सोडतात, अपयश येते, कष्टांचे फळ मिळत नाही आणि मन खचून जाते. अशा वेळी माणसाला पुन्हा उभे करणारी गोष्ट म्हणजे त्याचा दृष्टीकोन.दृष्टीकोन म्हणजे एखाद्या व्यक्तीची विचार करण्याची पद्धत, एखाद्या घटनेकडे किंवा परिस्थितीकडे पाहण्याची दृष्टी. एकाच घटनेकडे दोन