प्रिय सोना..आपल्या आयुष्याचा हा सुहाना सफर तुझ्यापुढे वाचते आहेMade for each other....पासून सुरू झालेला हा आपला प्रवासअगदीMad for each other पर्यंत पोचला होताआपल्या लग्नापूर्वी आपण एकमेकांना भेटत होतो तेव्हाच आपले भावबंध ️ जुळले होतेशांत, संयमी, मितभाषी तूअणि धीट, थोडीशी उतावीळ ,आणि बडबडी मीआपली जोडी खरच देवाने छान जमवली होतीआपले लग्न ठरले हाही एक गमतीचा योगायोग होताबरीच स्थळे बघून आणि नाकारून झाल्याने घरचे माझ्या लग्नाबाबत निराश झाले होतेतशात एक डॉक्टर स्थळ मला बघायला येते आहे ते मला कशाला पसंत करतील अशा विचाराने व काही महत्वाच्या कारणाने वडील घराबाहेर होतेआई आणि मी दोघीच घरातसंभाषण सूत्रे माझ्याकडेच होतीतू तर मला बघितल्या क्षणी आवडला