भाग १: फाईल क्रमांक BT-001मुंबई. रात्रीचे १०:४५.दक्षिण मुंबईतील एका भव्य सरकारी इमारतीचा पाचवा मजला पूर्णपणे शांततेत बुडाला होता. दिवसभर अधिकारी, कंत्राटदार आणि फाईल्सच्या ढिगाऱ्यांनी गजबजणारं हे ऑफिस आता एखाद्या भुताटकीच्या वाड्यासारखं भासत होतं. कॉरिडॉरमधील बहुतेक दिवे बंद झाले होते, फक्त कोपऱ्यातल्या एका केबिनमधून संगणकाच्या स्क्रीनचा मंद निळा प्रकाश बाहेर पडत होता.त्या केबिनच्या दारावर एका पाटीवर लिहिलं होतं—'आर्यन देशमुख – वरिष्ठ डॉक्युमेंट Controller'.आर्यनने खुर्चीत मागे टेकून बसत आपल्या चष्म्याचा काच पुसला. डोळ्यांवर प्रचंड ताण आला होता. वय वर्षे ४१, कपाळावर अनुभवाच्या काही आठी रेषा आणि डोळ्यांत कामाची कमालीची अचूकता. गेल्या दहा वर्षांत त्याने अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये आणि सरकारी प्रकल्पांमध्ये 'Building Information