ऑपरेशन ब्लॅक ताज - 2

  • 837
  • 387

आर्यनच्या मानेवरचा घाम आता पुरता गोठला होता. खोलीतल्या काळोखापेक्षा त्याच्या मनातला अंधार अधिक गडद झाला होता. स्क्रीनवर चमकणारी ती पांढरी अक्षरे—तुझ्या मागे पाहू नकोस—त्याला एका जागी खिळवून ठेवाण्याचा प्रयत्न करत होती. त्याच्या पाठीशी उभी असलेली आकृती इतकी जवळ होती की, तिच्या कपड्यांचा पुसटसा आवाजही आर्यनच्या कानावर पडत होता.त्याच्या मध्यमवर्गीय, साध्या मेंदूने त्याला ओरडून सांगितलं की शांतपणे शरण यावं. पण त्याच्यातल्या डॉक्युमेंट कंट्रोलरच्या तांत्रिक मेंदूने एक गोष्ट ओळखली. सिस्टीम लॉक झाली असली तरी यूपीएसवर चालणाऱ्या मॉनिटरच्या खालच्या बाजूला एक बारीक हिरवा दिवा लुकलुकत होता. याचा अर्थ, कॉम्प्युटरचा डेटा ट्रान्सफर अजूनही बॅकग्राउंडला सुरू होता. फाईल जरी बंद झाली असली, तरी तो ५०