प्रिय सोना..तुझ्या दवाखान्याचे गाव लांब होते तु त्या गावात थोड्याच अवधीत चांगले नाव कमवले होतेस तुझा प्रामाणिक स्वभाव..पैशाची हाव नसणे शिवाय अचूक निदान यामुळे लोकांचा तुझ्यावर विश्वास होता त्या काळात तू त्या गावात एकमेव डॉक्टर होतास तुझ्या शब्दाला गावात खूप मान होता ऊस आणि दुधाच्या व्यवसायात अग्रगण्य असलेले हे गाव सधन होते तू मात्र कोणाकडून कधी एखादी भाजीची पेंडी सुद्धा फुकट आणत नव्हतास तुझ्या दवाखान्याच्या मालकांच्या म्हशी होत्या ते रात्री ताजे काढलेले सकस दूध मात्र तू घेऊन यायचा ते सुद्धा पैसे देऊन ..तुझी निरलस वृत्ती, सेवाभाव, गोड नम्र बोलणे यामुळे गावातील असंख्य माणसे तुझ्यावर खुश होती आजही त्या गावात तुझे नाव काढले तरी अनेक लोक प्रेमाने आणि अदबीने बोलतात त्या