पावसाचा जोर अजूनही कमी झाला नव्हता. रात्रीचे दीड वाजले होते आणि मुंबईचे रस्ते पूर्णपणे निर्मनुष्य झाले होते. आर्यन धापा टाकत एका जुन्या, बंद पडलेल्या इंडस्ट्रियल इस्टेटजवळ पोहोचला. किआराने पाठवलेले लोकेशन याच ठिकाणचे होते. इस्टेटच्या गेटवर एकही सुरक्षारक्षक नव्हता, फक्त आतमध्ये एका कोपर्यात एक काळ्या रंगाची महिंद्रा स्कॉर्पिओ उभी होती. गाडीचे इंजिन बंद होते आणि लाईट्सही विझलेले होते.आर्यनने आजूबाजूला नजर फिरवली. त्याचे अंग पावसाने पूर्णपणे भिजले होते. थंडीने आणि भीतीने त्याचे दात वाजत होते. त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार होता, कल्याणला असलेली त्याची पत्नी भावना आणि त्याची लहान मुलगी सुरक्षित असतील ना? किआराने पोलिसांची गाडी तिथे पाठवली होती, पण सिंघानियाचे गुंड