जफर खान आणि शेट्टी भाईच्या अंतानंतर मुंबईच्या गुन्हेगारी जगतात मिस्टर मनी नावाचा एक असा दबदबा निर्माण झाला होता, ज्याची कल्पना आजवर कोणीच केली नव्हती. आता मनीचे वय चोवीस वर्षे झाले होते. त्याचे साम्राज्य केवळ मुंबई किंवा भारतापुरते मर्यादित राहिले नव्हते, तर दुबई, बँकॉक आणि लंडनपर्यंत त्याचे बेकायदेशीर धंदे पसरले होते. समुद्राच्या मार्गाने होणारी शस्त्रास्त्रांची आयात, आंतरराष्ट्रीय मनी लाँड्रिंग, डार्क वेबवरील गुप्त व्यवहार आणि आशियातील सर्वात मोठे कॅसिनो या सगळ्यावर आता मिस्टर मनीची हुकूमशाही चालत होती.त्याचे साम्राज्य जेवढे मोठे होते, तेवढीच त्याची सुरक्षा व्यवस्था चोख होती. दक्षिण मुंबईतील एका अत्यंत आलिशान आणि गगनचुंबी इमारतीचे वरचे तीन मजले हे त्याचे मुख्य केंद्र