मनस्वी आणि बोलणारी जादूची बाहुली

  • 494
  • 96

मनस्वी 6वर्षांची गोड मुलगी होती. ती गावाकडे  राहायची. तिला गोष्टी ऐकायला आणि प्राण्यांशी खेळायला खूप आवडायचं. तिचे बाबा तिला नेहमी म्हणायचे "बेटा, चांगली मुलगी बन".वाढदिवसाच्या दिवशी सकाळपासूनच घरात धामधूम होती. आईने मनस्वीचा आवडता पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता. सगळे पाहुणे आले आणि गिफ्ट देऊ लागले. आज वाढदिवस होता. तिला खूप सारे गिफ्ट मिळाले. पण सगळ्यात आवडलेली भेट होती एक सुंदर बाहुली. तिचे डोळे मोठे मोठे आणि फ्रॉक गुलाबी रंगाची होती.रात्री झोपताना मनस्वीने बाहुलीला जवळ घेतले आणि म्हणाली, "शुभ रात्री मैत्रिणी."बरोबर रात्री 12 वाजता... "टिक टिक" मनस्वी जागी झाली. तिने पाहिलं तर बाहुली हसत होती! "हॅलो मनस्वी, मी परी आहे. मी एक जादूची बाहुली