Story Title: टोपलीवाला काका आणि जादूचे फळकराड जवळच्या "सुखगाव" नावाच्या छोट्याशा गावात टोपलीवाला काका राहत होते. त्यांचं वय सत्तर वर्षं होतं. अंगावर नेहमी जुनं धोतर आणि डोक्यावर फळांची टोपली असायची. पायात चपला नसल्या तरी त्यांचा चेहरा नेहमी हसरा असायचा.काका सकाळी 4 वाजता उठायचे. जंगलात जाऊन आंबे, पेरू, चिकू गोळा करायचे. मग ते गावातल्या शाळेच्या बाहेर उभे राहायचे. सुट्टी झाली की जी मुलं गरीब होती त्यांना हात 1-1 फळ द्यायचे आणि म्हणायचे, "बाळांनो, पोट भरून खा. अभ्यास करून मोठे व्हा. गावाचं नाव मोठं करा."गावात जवळपास 50 घरे होती. त्यातली 15 घरं खूप गरजू होती. पावसाळ्यात त्यांच्या घरात चूल पण पेटत नव्हती.