प्रस्तावना"प्रत्येक प्रेमकथेची सुरुवात 'I Love You' ने होत नाही... काही प्रेमकथा फक्त एका नजरेने सुरू होतात."२०२१.तो दिवस माझ्यासाठी इतर दिवसांसारखाच सुरू झाला होता. एका लग्नाची लगबग, गोंधळ, नातेवाईकांची धावपळ, हसणारे चेहरे आणि आनंदाचं वातावरण. मीही त्या गर्दीचा एक भाग होते. मला मुळीच कल्पना नव्हती की काही क्षणांत माझं आयुष्य एका अनोळखी व्यक्तीच्या एका नजरेमुळे कायमचं बदलणार आहे.त्या गर्दीत अचानक माझी नजर एका मुलावर जाऊन थांबली.तो माझ्याकडे पाहत होता की नाही, हेही मला आठवत नाही.आमच्यात एकही शब्द