प्राक्तन -१२ यश मयुरेशला सगळं सांगत होता. त्याची आणि अनिशाची भेट इथे किती अनपेक्षितपणे घडली, त्यानंतर तिचं नैराश्य, त्याला कंटाळून तिने घेतलेला टोकाचा निर्णय... त्यानंतर त्याने तिला रोखलेलं, शिवाय तिला यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगितला. शिवाय सुखरूपपणे ती यातून बाहेर पडली. यातून त्यांची झालेली मैत्री, आणि त्याच कालावधीत तिने जास्त ताण न घेता मयुरेशकडे दुर्लक्ष केलेलं. कदाचित यामुळेच त्याला त्याची चुक लक्षात आली. आणि काल यशने त्याच्या आयुष्याचा तिच्यासमोर केलेला उलघडा, त्यातून त्याला आलेला मिनी अटॅक, तेव्हा अनिशानेच त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं आणि त्याची काळजी घेतली. म्हणूनच तिला घरी यायला उशीर झाला. आणि आज मयुरेशने त्याच्या चुकीची दुरुस्ती करण्याची दाखवलेली तयारी, दोघांचे