कोकणातले भोरपी - भाग 1

  • 884
  • 1
  • 231

कोकणातले भोरपी  भाग 1                    लावणी  सुरू होण्याचा  हंगाम आलेला होता.  त्यावेळी  सकाळ संध्याकाळ दोन वेळा शाळा  भरायची.  नऊ वाजता लघवीची सुटी झाली नी आम्ही वर्गा बाहेर पडून देवराईकडे दडदडत निघालो.  ग्रामपंचायती समोर  एस्टीची गाडी  वळून जायची तिथे आलो नी  बघतो तर काय ...... उघडे बंब काष्टी  लावणारे  चार पाच बापये शंकरेश्वराच्या ओवरी बाहेर चिंचेखाली  सात आठ बांग़र पाडे  घेवून उभे होते. त्यातल्या दोघा जणांनी बाही छट मुंडी- कोपरी घातलेली होती. पोरगेला होता त्याने घाटवळी घालतात   तसला   पोटावर खिसा असलेला   गोल गळ्याचा मांजरपाटाचा  गंजीफ्रॉक वजा सद्रा   घातलेला होता. आम्ही लघवी करून आलो तो