प्रिय सोना आपला दोघांचा स्वभाव सकारात्मक आणि उत्साही असल्यानेव आपली आवड एकसारखी असल्यानेआपल्या व्यस्त चक्रात सुद्धा आपण जास्तीत जास्त एकमेका साठी द्यायचोसंपूर्ण सांसारिक आयुष्यात आपण नोकरी व्यतिरीक्त कधीच एकमेकांना सोडून गेलो नाहीकाही वेळा असे काही कुणाला सांगितले की त्यांना थोडी असूया वाटेमग तुच म्हणायचा.. कशाला लोकांना आपले काही सांगत असतेस?आपले आपल्या पाशी ठेवायचेकुणाची कधी असूया नाहीकोणाचा राग द्वेष नाहीसरळ साधा "अजातशत्रू"होतास तूआपले कायम एकत्र असणे पाहून आपल्या घरच्या कार्यक्रमात सुद्धा जरी पुरुष बायकांच्या पंगती वेगळ्या असल्या तरीघरचे लोक आपल्याला शेजारी शेजारी जेवायला वाढायचेअगदी दोन वेगवेगळ्या खोल्यात सुद्धा आपण कधी बसलो नाहीतुला फिरायची खूप आवड होतीआपण वेगवेगळ्या ठिकाणी रविवारी जात असू