कोकणातले भोरपी - भाग 2

  • 540
  • 1
  • 177

                             कोकणातले भोरपी  भाग 2                  मथवून मथवून  त्या माणसाला डफ़ावर चढवला की, तो मागचा पुढचा विचार नकरता चढ्या  दराने सौदा करी. अशावेळी जनावरसोडून त्याच्या ताब्यात देताना जमलेल्यां पैकी कोणीतरी चौकशी केली  की बिलंदर भोरपी ठरलेल्या दरापेक्षा आणखी वीस पंचवीस जादाचा आकडा फोडीत. उलट जनावर खरेदी करताना  जनावर बघितल्यावर त्याना अचूकअंदाज यायचा.  हे जनावर  वय झालेलं आहे, लंघलेलं आहे. आपल्याखेरीज  दुसरं कोणीही गिऱ्हा ईक हे उचलणार नाही. हे पक्कं हेरून ते ढोराची केंड करीत.“अरा ऽऽरा, निस्तं कातडं नी हाडं हाईत शेठ. आमी धा गाव फिरणारं. वाटेला कुटे  गचकलं  तर मुदलातच बूड......” नी अगदी  पडत्या भावाने आकडा फोडीत. मालक रंजीस येवून काय काय बतावण्या करीत असे. पण भोरपीसहसा मागितल्या शब्दाबाहेर छादामही जादा