शिवेंद्र आणि बोलणारा मोर - 2

  • 534
  • 189

शिवेंद्र आणि बोलणारा मोर - भाग 2"हरवलेलं निळं पीस आणि खारुताईची मदत"एकदा काय झालं...उन्हाळ्याची सकाळ होती. आकाशात एकही ढग नव्हता. शिवेंद्र शाळेतून आल्यावर नेहमीप्रमाणे मोराला भेटायला जंगलात गेला. जंगलात मस्त थंड वारा सुटला होता आणि झाडांवर पक्षी गाणी म्हणत होते. पण आज मोर खूप उदास दिसत होता. त्याचे डोके खाली होते आणि तो एका झाडाखाली शांत बसला होता. "अरे मोरदादा काय झालं? तू आज बोलत का नाहीस? आणि नाचत का नाहीस?" शिवेंद्रने काळजीने विचारलं आणि मोराच्या जवळ जाऊन बसला.मोराने एक मोठा सुस्कारा सोडला आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाला, "शिवेंद्र, माझं सगळ्यात आवडतं निळं पीस हरवलं आहे. ते पीस माझ्या आजीने मला