प्रिय सोना..त्या काळात आपल्या आयुष्यात दोन तीन लक्षात राहण्या सारख्या गोष्टी घडल्या होत्या तुझ्या मावस भावाची पत्नी आजारी होती त्यांच कुलदैवत जोतिबा होतजोतिबाचे दर्शन घेण्याकरीता त्यांच्या दोन मुली आणि तुझा भाऊ अशी त्यांची फॅमिली घेऊन कोल्हापूरला आल्या त्यांच्यासोबत दत्तू अण्णा म्हणून त्यांचे गुरु आले होते त्यांचे वय ८५ होते अत्यंत तेजस्वी, पण सरळ साधे व्यक्तिमत्व असणारे दत्तू अण्णा केवळ भाऊजींच्या आग्रहामुळे आपल्या घरी आले होते अन्यथा ते आपली कुटी सोडून कोठे जात नसत अगदी भाऊजीकडे सुद्धा ते कधी राहिले नव्हते ते आपल्याकडे राहायला तयार झाले होते आपण त्यांची चांगली व्यवस्था ठेवली होती चवदार साधे बिन मसाल्याचे जेवण मी त्यांच्या साठी रांधले होते मी संध्याकाळी केलेली मूग डाळ खिचडी, पापड, कढी, घरचे